जरांगे-सरकारमधील संघर्ष पेटणार ? -मंडपही हटविण्याचा प्रयत्न, जरांगे अंतरवालीत दाखल..

24 प्राईम न्यूज 28 Feb 2024
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे- पाटील यांच्याविरोधात राज्य सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तयांच्या आंदोलनाची थेट एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यावर आता जरांगे- पाटील यांनीही आक्रमक पवित्रा घेतला असून, माझी एसआयटी चौकशी करायची असेल, तर जरूर करा. मी भीत नाही. परंतु सरकारनेही आरक्षणाच्या मुद्यावरून काय कटकारस्थान केले, त्याचीही एसआयटी चौकशी झाली पाहिजे. असे म्हणत आपला आक्रमक बाणा कायम ठेवला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात मराठा आंदोलक विरुद्ध सरकार संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे-पाटील थेट संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र, एकीकडे जरांगे-पाटील यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न होत असतानाच आता अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळावरील मंडप हटविण्याच्या हालचाली पोलीस करीतअसल्याची माहिती जरांगे-पाटील यांना मिळाली. त्यामुळे जरांगे तत्काळ छ. संभाजीनगर येथून थेट अंतरवालीत दाखल झाले. यावरून आता जरांगे आक्रमक झाले असून, मी एखादेवेळी तुरुंगात सडायला तयार आहे परंतु अंतरवालीतील मंडपाला हात लावू देणार नाही. त्याचे एक कापडही हटवू देणार नाही, असा इशारा दिला आहे.
