सुप्रिया सुळे यांच्या ‘व्हॉट्सअॅप’ स्टेटसवरून उमेदवारी जाहीरराजकीय वर्तुळात तर्कवितर्काना ऊत..

24 प्राईम न्यूज 2 Mar 2024 गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्राचया राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून लवकरच त्याबाबत घोषणा होऊ शकते. परंतु, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे जागावाटप होण्यापूर्वीच एक अनपेक्षित कृती केली आहे. सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर एक फोटो लावला. यामध्ये त्यांनी स्वतःला बारामती लोकसभेचा उमेदवार म्हणून जाहीर केले. या स्टेटसमध्ये शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे या तिघांचेही फोटो आहेत. तसेच नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) चिन्ह असलेला तुतारी वाजवणारा माणूस सुळे यांच्या स्टेटसवर झळकत होता. सुप्रिया सुळे यांनी अशाप्रकारे तडकाफडकी स्वतःची उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या.

सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मी बारामतीमधून स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीकडे मला बारामतीची उमेदवारी देण्याची विनंती केली आहे. मी बारामतीमधून लढण्यासाठी इच्छूक आहे. त्यामुळे मी डिझाईन करुन स्टेटसला ठेवले. आता मला तिकीट मिळावे, ही माझी विनंती..