सरकारी कर्मचाऱ्यांचा १ मेपासून संपाचा इशारा.

24 प्राईम न्यूज 2 Mar 2024

जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांनी १ मेपासन बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. केंद्र आणि विविध राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा समावेश असलेल्या द जॉईंट फोरम फॉर रिस्टोरेशन ऑफ ओल्ड पेन्शन स्कीमने (जेएफआरओपीएस) या संपाचा इशारा दिला आहे. त्यात प्रामुख्याने देशातील रेल्वे कामगारांच्या संघटनांचा समावेश आहे. त्यांनी १ मेपासून देशातील रेल्वे सेवा ठप्प करण्याचा इशारा दिला आहे. २००४ पूर्वी जुनी पेन्शन योजना (ओपीएस) कार्यान्वित होती. त्यानंतर नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस) लागू करण्यात आली. त्याला या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. नव्याऐवजी जुनीच पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.