नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचा आज अंतिम सामना.                                               -मालेगाव विरुद्ध सुरत संघात रंगणार लढत,मंत्री अनिल पाटील देणार उपस्थिती

0

24 प्राईम न्यूज 2 Mar 2024

अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात गेल्या काही दिवसांपासून सुरू अलेली नामदार चषक क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून आज दि 2 रोजी अंतिम सामना सकाळी 11 वाजता होणार असून मालेगाव सिएमसीए विरुद्ध पार्थ टेक्स सुरत संघात दमदार लढत होणार आहे,विशेष म्हणजे मंत्री अनिल भाईदास पाटील हे स्वतः हा सामना पाहण्यासाठी उपस्थिती देणार आहे.
अंतिम सामन्याची जय्यत तयारी आयोजकांनी केली असून हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट शौकिनांची मोठी गर्दी आज उसळणार आहे.दरम्यान काल दिनांक 1 रोजी
शुक्रवारी रोजी सकाळ च्या सत्रात उपांत्य फेरीचा सामना C.M.C.A ,मालेगाव विरुद्ध S.V.K.M , धुळे संघात झाला. धुळे संघाने टॉस जिंकून प्रथम प्रथम फलंदाजी निर्धारित २० षटकात ९ बाद १२५ धावा बनवल्या .पाठलाग करताना मालेगाव संघाने निर्धारित १७.३ षटकात १३१ धावा बनून अंतिम फेरीत प्रवेश केला. सामनावीर अझर अन्सारी ठरला . सामनावीर पारितोषिक माजी नगराध्यक्षा तथा माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. अझर अन्सारी ने फलंदाजीत ५६ धावा बनवल्या.
दुपारच्या सत्रात सामना बडोदा फायटर, बडोदा विरुद्ध पार्थ टेक्स , सुरत या संघात झाला , बडोदा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात १०३ धावा बनवल्या . पाठलाग करताना सुरत संघाने सहज विजय मिळवला .पार्थ टेक्स्ट संघाने १६.२ षटकात पाठलाग पूर्ण केला . सामनावीर सिद्धार्थ केने ठरला . सामनावीर पारितोषिक खा. शि.मंडळाचे संचालक पंकज जैन , दिनेश मणियार , डॉ जैन यांच्या हस्ते देण्यात आले.
दोन लाखांचे इनाम नामदार चषकाचा मानकरी कोण याचा फैसला आज होणार असल्याने या लढतीचे साक्षीदार होण्यासाठी आणि खेळात रंगत आणण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!