पारोळा येथे ४३०० बालकांना पोलिओ डोस..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा शहरात पाच वर्षां आतील बालकांसाठी रविवारी राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेंतर्गत ४ हजार ३०० बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. लसीकरणासाठी दिल्ली दरवाजा, राममंदिर चौक,मडक्या मारूती चौक,झपाट भवानी चौक,मोहरीर हॉस्पिटल,बसस्थानक,तलाठी कार्यालय आदी एकूण १५ ठिकाणी बूथ उभारून सोय करण्यात आली.त्यासाठी ५३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.४ हजार ५५० बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट होते.दिवसभरात ४ हजार ३०० बालकांना डोस देण्यात आले. दरम्यान ५ ते ९ मार्च या कालावधीत १० पथकांमार्फत राहिलेल्या बालकांना घरोघरी जाऊन पोलिओ डोस देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी कुटीर रुग्णालयाचा संपूर्ण टीम ने परिश्रम घेतले.