महागाई पासून दिलासा देण्यासाठी भारत तांदूळ केंद्राचे आज अमळनेर शहरात होणार उद्घाटन. -सर्वसामान्यांना २९ रुपये किलो दराने खरेदी करता येणार तांदू -कार्यक्रमाला उपस्थितीचे लक्ष्मी फूड प्रोसेसर्सतर्फे आवाहन

अमळनेर/प्रतिनिधी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी भारत तांदुळ सुरू केला. आता सर्वसामान्यांना २९ रुपये किलो दराने तांदूळ खरेदी करता येणार आहे. अमळनेरातही हे केंद्र मंगळवारी दिनांक ५ मार्च रोजी सुरू होत आहे. याचे उद्घाटन तिरंगा चौक बाले मिया जवळ सायंकाळी ४ वाजता होणार आहे. उद्घाटनप्रसंगी माजी आमदार स्मिताताई वाघ, माजी नगराध्यक्षा तथा जि.प. सदस्या जयश्रीताई अनिल पाटीलसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे.
देशात महागाई वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहेत. त्यातही देशात तांदळाच्या किरकोळ किंमतीत वाढ होत आहे. त्यामुळेच आता केंद्र सरकारकडून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र शासन देशात भरात तांदूळ आणणार आहे.
देशातील वाढत्या महागाईच्या काळात सरकारने नागरिकांसाठी हा निर्णय घेतला आहे. त्यात तांदूळ २९ रुपये प्रति किलो दराने विकला जाणार आहे. हा अनुदानित तांदूळ १० किलोंच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना कमी किंमतीत चांगला तांदूळ मिळणार आहे.
खाद्य मंत्री पियुष गोयल यांनी दिल्लीत भारत राइस ऑन ड्युटी लॉन्च केली आहे. दरम्यान अमळनेर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अमळनेरच्या लक्ष्मी फूड प्रोसेसर्स यांच्यावतीने करण्यात आले आहे.