आता पुन्हा एकत्र येणे नाहीच-अजित पवार.

24 प्राईम न्यूज 5 Mar 2024. आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करतोय.वेगवेगळ्या काळात आम्ही एकमेकांविरोधात निवडणूक लढलो होतो, परंतु परिस्थितीनुसार त्या त्या वेळी निर्णय घ्यावा लागतो. आपली वेगळी वाट आहे, त्यांची वेगळी वाट आहे.आजही लोकांच्या मनात शंका आहे. बरेच जण म्हणतात की, हे परत एकत्र येतील की काय ? अरे बाबांनो, आता आमच्यात फाटलंय. उगाच मनात काही शंका ठेवू नका,असे म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या मनातील शंका दूर केली अजित पवार सोमवारी शिरूर येथील शेतकरीमेळाव्यात बोलत होते.