हैदराबाद मधून असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात भाजपने रिंगणात उतरवलेल्या डॉ. माधवी लता कोण आहेत ?

0

24 प्राईम न्यूज 5 Mar 2024. तेलंगणातील बहुचर्चित हैदराबाद लोकसभा मतदारसंघात भाजपनं माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी या मतदारसंघाचे खासदार आहेत.

हैदराबाद लोकसभा मतदारसंघ एमआयएमचा भक्कम बालेकिल्ला मानला जातो. १९८४ पासून हा मतदारसंघ एमआयएमकडे आहे. असदुद्दीन यांचे वडील सुलतान सलाऊद्दीन १९८४ मध्ये पहिल्यादा या मतदारसंघातून निवडून आले. २००४ पर्यंत म्हणजेच २० वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. त्यानंतर त्यांचे पुत्र असदुद्दीन ओवेसी यांनी इथून लोकसभा निवडणूक लढवली. सध्या ते या मतदारसंघाचे खासदार आहेत.

माधवी लता नेमक्या कोण?

भाजपनं ओवेसी यांच्या विरोधात नवा चेहरा दिला आहे. ओवेसी यांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान देण्याची अवघड कामगिरी डॉ. माधवी लता यांना पार पाडावी लागेल. त्या विरिंची हॉस्पिटलच्या चेअरपर्सन आहेत. सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. हिंदुत्त्ववादी भूमिकांमुळे त्या चर्चेत असतात.

रुग्णालयाच्या चेअरपर्सन असलेल्या माधवी लता भरतनाट्यम नर्तिकादेखील आहेत. हैदराबादमध्ये सामाजिक कार्यात त्या अग्रेसर असतात. ट्रस्ट आणि संस्थांच्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्या काम करतात. लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लतामा फाऊंडेशनच्या त्या प्रमुख आहेत. कोटी महिला कॉलेजातून त्यांनी राज्यशास्त्रातून M.A.केलं आहे. हिंदू धर्माबद्दलची त्यांची भाषणं व्हायरल होतात. याआधी या मतदारसंघात भाजपकडून भगवत राव यांनी निवडणूक लढवली होती. आता लता यांच्या रुपात भाजपनं हैदराबादमधून पहिल्यांदाच महिला नेत्याला तिकीट दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!