दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागताचा कार्यक्रम संपन्न..

अमळनेर/ प्रतिनिधी. साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत नूतन माध्यमिक विद्याल्य अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयातील केंद्र क्रमांक 3106 वर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला. या केंद्रावर साधारणतः 650 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. एक मार्च 2024 रोजी सुरू झालेल्या परीक्षेसाठी प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवडक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील,सहसचिव ॲड अशोक खंडेराव बाविस्कर माजी अध्यक्ष गुणवंत गुलाबराव पाटील, संचालक भास्करराव रामचंद्र बोरसे, संचालक किरण पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. केंद्र संचालक सुनील पाटील व उपकेंद्र संचालक श्रीमती अनिता बोरसे तसेच बाविस्कर नाना यांनी विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक डी ए धनगर यांनी केले. यावेळी सर्व पर्यवेक्षक विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. सदर परीक्षा आनंददायी वातावरणामध्ये भयमुक्त व भीती मुक्त संपन्न होईल असे पालकांना मान्यवरांनी आश्वासित केले.