शाहबाज शरीफ पाकच्या पंतप्रधानपदी.

0

24 प्राईम न्यूज 4 Mar 2024.

पाकिस्तानमध्ये शाहबाज शरीफ हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ झाले आहेत. पाकिस्तानचे ते २४ वे पंतप्रधान असून त्यांना नॅशनल असेंब्लीमध्ये २०१ खासदारांचा पाठिंबा मिळाला, तर ९२ खासदारांनी ‘पीटीआय’ समर्थक उमेदवार उमर अयुब यांना मतदान केले. विरोधकांच्या घोषणाबाजीत नॅशनल असेंब्लीचे सभापती सरदार अयाज सादिक यांनी हा निकाल जाहीर केला. शाहबाज शरीफ हे सोमवारी अध्यक्षीय प्रासादात पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!