भाजप उमेदवारांची चिठ्ठी माझ्या खिशात.रावसाहेब दानवें.

24 प्राईम न्यूज 8 Mar 2024. भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात आहे, असे म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीवरून नाशिकमध्ये चिठ्ठीबॉम्ब टाकल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. गुरुवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यामांशी संवाद साधताना रावसाहेब दानवे यांनी धुळे, जळगाव, रावेर, पाचोरा, अकोला, भंडारा, गडचिरोली, नांदेड, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी या मतदारसंघांचा उल्लेख केला आहे.
थोड्याच वेळात याबाबत डिटेलमध्ये बोलतो, असे म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. एकीकडे जागावाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना दुसरीकडे भाजप नेते रावसाहेब दानवेंनी नाशिकमध्ये दावा केल्याने चर्चाना उधाण आले आहे.