जागतिक महिला दिनानिमित्त व महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर श्रीमती भानूबेन बाबूलाल शाह गोशाळा मार्फत गरिबांना शिधावाटप.


अमळनेर /प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त भानूबेन बाबूलाल शहा गोशाळा यांचे मर्फत श्री बी जे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा,मुंबई तसेच स्वस्तिक जीवदया ग्रुप अंधेरी,मुंबई,कमलेश सावला (मानद पशु कल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन), विपुल भाई जैन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीचे औचित्य साधून 1000 परिवारास अल्प शिधा साहित्य वाटप संपूर्ण अमळनेर शहरातील गोरगरीब जनतेस करण्यात आले प्रामुख्याने ढेकू रोडवरील सर्व भिलवस्त्या टाकरखेडा रोडवरील म्हाडा कॉलनी त्याचबरोबर पळासदळे रस्ता परिसरातील असलेल्या गोशाळा परिसरातील सर्व विट भट्टी मजूर यांना, रुबजीनगर व खळेश्वर,खाटेश्वर,वर्णेश्वर,ताड्या तलाव परिसरात अल्प शिधा साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी भानूबेन बाबुलाल शहा गोशाळेचे प्रमुख चेतन बाबुलाल शहा,माजी नगरसेवक प्रा अशोक पवार, सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे,श्री साई गजानन सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहन पाटील त्याचबरोबर डी ए पाटील, भरतसिंग परदेशी, माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, भटू कुंभार,बापूराव ठाकरे सर,चेतन धनगर ,मनीष राजपूत,सिटू दोढीवाला,धर्मेश निकुंभ,यतीन(मुन्ना)पवार,रामकृष्ण देवरे, महेंद्र साळुंखे
यांच्या हस्ते अगोदर संध्याकाळी वाटप केलेल्या कुपन नुसार सर्वांना शिधा वाटप करण्यात आला. आनंदी मन आणि आनंदी चेहरा घेऊन सर्व गोरगरिबांनी याप्रसंगी प्रत्येक ठिकाणी शिधा वाटप करणाऱ्या सर्व लोकसेवकांसाठी व दात्यासाठी गोरगरिबांनी शुभेच्छा दिल्यात.अश्याप्रकारे सर्वसामान्य गरीब जनतेने दात्यांना आशीर्वाद दिलेत.