रोहित पवारांना ईडीचा दणका कन्नड सहकारी साखर कारखाना सील..

0

24 प्राईम न्यूज 9 Mar 2024. राज्यसहकारी बँकघोटाळाप्रकरणीअंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) शुक्रवारी छत्रपती
संभाजीनगरच्या कन्ड तालुक्यातील
बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला
कन्नड सहकारी साखर कारखाना
सील केला आहे. प्रिव्हेन्शन ऑफ
मनी लाँड्रिंग (पीएमएलए), २००२
कायद्यानुसार ही कारवाई करण्यात
आली आहे. ईडीची ही कारवाई
म्हणजे कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी
काँग्रेसचे (शरदचंद्र भपवार गट)
आमदार रोहित पवार यांना
लोकसभेआधी मोठा दणका मानला जात आहे. ईडीने शुक्रवारी कारवाई केलेल्या कारखान्याचे मूल्य ५० कोटी २० लाख रुपये एवढे आहे.कारखान्याच्या १६१ एकर जमिनीसह प्लांट, यंत्रसामुग्री आणि कारखान्याच्या इमारतीवरही ईडीने टाच आणली आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वीच ईडीने रोहित पवार यांची चौकशी केली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेला कन्नड सहकारी साखर कारखाना दिवाळखोरीत निघाल्यानंतर राज्य सहकारी बँकेने कारखान्याचा २०१२ मध्ये लिलाव केला होता. हा कारखाना आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो लिमिटेडने ५०.२० कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. त्यावेळी लिलावाच्या बोली प्रक्रियेत बारामती अॅग्रोसोबतच हायटेक इंजिनिअर्स कॉर्पोरेशन इंडिया लि. सह इतर २ कंपन्या होत्या. लिलावात सहभागी झालेल्या हायटेक इंजिनिअर्स कंपनीच्या बँक खात्यांच्या तपासणीत असे आढळून आले की २५ ऑगस्ट २०१२ रोजी हायटेक इंजिनिअर्स कंपनीला बारामती अॅग्रोकडून ५ कोटी रुपये मिळाले. त्यानंतर २ दिवसांनी हायटेकने कन्नड साखर कारखान्याच्या खरेदी प्रक्रियेत बोली लावण्यासाठी अनामत रक्कम भरण्याकरिता या रकमेचा वापर केला. या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा ईडीचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वीच बारामतीतील कारखान्यासह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी छापे टाकले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!