शिंदे, पवार, नाराज मित्रपक्षांचा अधिक जागांसाठी अग्रह.

24 प्राईम न्यूज 9 Mar 2024. महायुतीच्या जागावाटपात भाजपकडून ३०-३२ जागांवर दावा करण्यात येत असून त्यामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या वाट्याला अतिशय कमी जागा येणार असल्याने या पक्षातील नांमध्ये नाराजी पसरली आहे.

भाजपने शिंदे गटातील विद्यमान खासदारांच्या जागाही मागितल्या असून त्या दिल्यास पक्षात असंतोष निर्माण होईल त्यामुळे विद्यामान खासदारांच्या जागांसह आणखी जागा मिळविण्यासाठी शिदे-वार आग्रही असून त्याबाबत त्यांनी नधी किल्लीला जाऊन भाजप पक्षश्रेष्ठीशी शुक्रवारी रात्री चर्चा केली.
शिदे गटाला शिवसेनेने २०१९ मधी लढविलेल्या २३ जागा हच्या असून सध्या त्यांच्याकडे १३ खासदार आहेत. या १७ जागा आमच्याकडे कायम ठेवाव्यात, अशी शिदे गटाची मागणी आहे. भाजप शिवसेनेसाठी १७ जागाही सोडण्यास तयार नसून गजानन कीर्तीकर यांच्या पायव्य मुंबई नतदारसंघासह आणखी दोन मतदारसंघ त्याचबरोबर तटकरे सांचा रायगड मतदारसंघी भाजपला हवा आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाचे खासदार असलेल्या जागा भाजपला हव्या आहेत. भाजप देईल, तेवढ्याच जागा स्वीकाराच्या लागतील, असी स्पष्ट कल्पना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुकतीच मुंबईत शिंदे- पवार यांच्याबरोबर झालेल्याबैठकीत दिली आहे. अजित पवार गटाला अधिकच्या जागांची अपेक्षा असली तरी जास्त जागा सोडण्यास भाजपची तयारी नाही. शिवसेनेच्या विद्यमान खासदारांसह काही इच्छुक नेत्यांना उमेदवारी नाकारल्यास ते उद्धव ठाकरे गटाकडे तर राष्ट्रवादीतील इच्छुकांना उमेदवारी नाकारल्यास ते शरद पवार गटाकडे परत जाण्याचीभीती शिंदे-पवार यांना वाटत आहे. भाजपने शिंदे यांना शिवसेनेने गेल्या निवडणुकीत लढविलेल्या जागाही नाकारल्या आणि त्यांनी ते मान्य केले, तर त्यातून शिंदे गटात चुकीचा संदेश जाईल आणि नेते नाराज होतील, अशी भीती आहे. अजित पवार गटालाही केवळ तीन-चार जागा मिळण्याची शक्यता असल्याने आणि पक्षातील नेत्यांमध्ये त्याबाबत नाराजी असल्याने भाजप पश्चश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी शिंदे-पवार नवी दिल्लीला गेले आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीसही जागावाटपाच्या चर्चेत सहभागी आहेत. मात्र शिंदे- पवार गटाच्या हाती फारसे काहीं लागण्याची शक्यता नसून भाजप किमान ३० जागा लढविण्यावर ठाम आहे.