अल्पसंख्याक मेळावा आणि नवनियुक्त पदाधिकारी पदवाटप समारंभ.

24 प्राईम न्यूज 10 Mar 2024.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस मा.इर्शादभाई जहागिरदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व धुळे शहर कार्याध्यक्ष जावेद बिल्डर अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष माजिद अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला अल्पसंख्यांक मेळावा पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विकासात्मक आणि सर्व समाजाच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या अजेंड्याला स्वीकारून सामाजिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवक पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मा. श्री. कैलास भाऊ चौधरी धुळे शहर जिल्हाध्यक्ष, सौ जया ताई साळुंखे महिला जिल्हाध्यक्ष, महेंद्र दादा शिरसाठ सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस, ज्ञानेश्वर पाटील कार्याध्यक्ष, सुरेश अहिरे, उमेश महाले, जयेश पाटील,चेतन पाटील, फरजाना शाह,संतोष केदार, एजाज शेख, राहुल पोळ, नरेंद्र अहिरे, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..