शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या कामाचे मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात भूमीपूजन.                                       -70 कोटी निधीतून साकारणार चार महत्वपूर्ण रस्ते.

0

अमळनेर/प्रतिनिधी

अमळनेर -शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या कामाचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते थाटात भूमिपूजन करण्यात आले. या चार रस्त्यांच्या कामासाठी एकूण ७० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
या निधीअंतर्गत धुळे रोड ते ओमशांती नगरला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २३.९६ कोटी, गलवाडे रोड ते धुळे रोडसाठी २९.५२ कोटी, तुळजाई हॉस्पिटल ते पिपळे रोड ३.१६ कोटी व ईदगाह मैदान ते विप्रो कंपनीसाठी १४.२४ कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे. या नवीन जोड रस्त्यांमुळे नेहमी लागणारे अंतर कमी होऊन नागरिकांना लवकरात लवकर इच्छित स्थळी पोहोचण्यास मदत होणार आहे.त्यामुळे सदर रस्ते अमळनेर साठी वरदान ठरणार आहेत.
सदर भूमीपूजन प्रसंगी महायुतीचे सर्व तालुका अध्यक्ष व सर्व शहर अध्यक्ष,सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच शहर विकास आघाडीचे सर्व पक्षीय नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. यावेळी अमळनेरमधील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर रस्त्यांच्या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!