चारचाकीतून २० हजार रुपये लंपास.

अमळनेर /प्रतिनिधी. चारचाकीमध्ये ठेवलेले २० हजार रुपये अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना १२ रोजी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बडोदा बँकेजवळ घडली.
मनोज जैन हे चौबारीहून चारचाकी (एमएच १९ सीव्ही ४५७२) ने बडोदा बँकेत आले. त्यांनी २० हजार रुपये बँकेतून काढून पिशवीत गाडीच्या मागच्या सीटवर ठेवले आणि बाजाराला निघून गेले.
सायंकाळी ५ वाजता परत आले असता त्यांना पिशवी दिसली नाही. अज्ञात चोरट्याने त्यांचे २० हजार रुपये काढून घेतले.
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हे.कॉ. हितेश चिंचोरे करीत आहे..