पारोळ्यात ‘सन्मान नारी शक्तीचा’ सांस्कृतिक कार्यक्रम. . -कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, विवीध स्पर्धेसह बक्षीस वाटप

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा – येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.किरण चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून महिला सशक्तीकरणासाठी महिलांचे स्वतंत्र व्यासपीठ व्हावे या उदात्त हेतूने महाशिवरात्री व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘सन्मान नारी शक्तीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमासह महाआरती,प्रसाद वाटप व विविध स्तरावर कार्यरत असलेल्या महिला भगिनींच्या सत्कार,गणेश वंदन,शिवतांडव नृत्य व वत्कृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात सौ किरण पाटील यांच्यातर्फे सेवाभावी संघटनांच्या कर्तृत्ववान ११ महिलांचा शाल,बुके व पैठणी देऊन सत्कार करण्यात आला, तर ५५ विद्यार्थ्यांना नृत्य व वकृत्व स्पर्धेत सहभाग घेतल्याने,त्या सर्व विद्यार्थ्यांना वॉटरबॅग बक्षीस देण्यात आले.
या सत्कारार्थी कर्तृत्ववान महिलांमध्ये सद्गुरु महिला गृह उद्योगाचा अध्यक्षा सुवर्णा पाटील, डॉ.वैशाली नेरकर,दक्षता समिती सदस्या रोहिणी फंड,होमगार्ड सपना अग्रवाल,होमगार्ड सुनिता शिंपी,कुटीर रूग्णालय परिचारिका राखी बडगुजर,न.पा. कर्मचारी वैशाली चौधरी,उषाबाई बेडवाल,महिला डॉयव्हिंग स्कूल प्रशिक्षक नेहा समीर वैद्य, अंगणवाडी सेविका ज्योती पाटील,ॲड स्वाती शिंदे या कर्तबगार महिलांना गौरविण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजे संभाजी मित्र मंडळ, दादासाहेब चंद्रकांत पाटील मित्र परिवार यांचे सहकार्य लाभले.