पारोळा तालुक्यातील नोंदणीकृत दिव्यांगांना साहित्य वाटप.

0


पारोळा प्रतिनिधी /प्रकाश पाटील

पारोळा – भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग द्वारा (ईडीआयपी) योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिंम्को) कानपूर यांच्यामार्फत राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनातून तसेच खासदार उन्मेश पाटील व करण पाटील यांच्या प्रयत्नाने गेल्या वर्षी पारोळा तालुक्यातील पूर्व तपासणी व नोंदणी झालेल्या दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यात आले.

दिव्यांग बांधवांसाठी योजनेअंतर्गत १७६ कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने प्राप्त झाली होती,त्यापैकी दि १४ रोजी उपस्थित जवळजवळ शंभर,एकशे दहा दीव्यांग बांधवांना महिला कल्याण समितीचा अंजली करण पाटील यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.त्यात सायकल, इलेक्ट्रिक तीनचाकी गाडी,कर्ण मशीन,काठी,हात काठी,स्टँड आदींचा समावेश आहे.

     यावेळी भाजपा अनुसूचित जाति मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मोहम्मद पठाण,तालुकाध्यक्ष अनिल पाटील,भटक्या विमुक्त जाती जिल्हाध्यक्ष शालिक पवार, नगरसेवक पी जी पाटील,भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक भैय्या चौधरी,बोळे सरपंच रावसाहेब गिरासे,भाजपा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण पाटील,सरचिटणीस विनोद पाटील,भाजपा व्यापारी जिल्हा उपाध्यक्ष मनोज जगदाळे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष भागवत चौधरी,ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष बापू महाजन, नगरसेवक तथा गटनेते बापू महाजन,नगरसेवक संजय पाटील,अनिल टोळकर,अभियंता सेल तालुकाध्यक्ष गणेश पाटील, अनुसूचित जमाती तालुकाध्यक्ष दिपक वानखेडे,समाजिक कार्यकर्ते कैलास पाटील,संकेत पाटील,भूषण महाजन आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!