मतदारसंघाच्या विकास व सर्वसामान्यांची सेवा हेच ध्येय ; डॉ.संभाजीराजे पाटील. -पारोळ्यात मंत्री अनिल पाटील यांचा उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा,अनेकांचा पक्षप्रवेश.

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा तालुका अनेक समस्यांनी ग्रासला आहे,त्यातच अनेक वर्षापासून पारोळा तालुक्यात आलटून पालटूनचे राजकारण सुरू आहे,पाहिजे तशी विकासकामे होतांना दिसून येत नसून तालुका हा विकासाअभावी आहे,पक्षाने संधी दिल्यास
मतदारसंघाच्या सर्वांगिण विकास व सर्वसामान्यांची सेवा हेच माझे ध्येय असुन ते गाठण्याची संधी मतदारांनी द्यावी,त्याचं सोनं करत सर्वच घटकांना न्याय देईल असे प्रतिपादन डॉ संभाजीराजे पाटील यांनी केले.
पारोळ्यात जिल्ह्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा उपस्थितीत अजित पवार गटातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचा आयोजीत मेळाव्यात ते बोलत होते.मेळाव्यास सुरूवातीपूर्वी मंत्री अनिल पाटील यांचा हस्ते अजित पवार गटातर्फे डॉ संभाजीराजे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला,त्यानंतर शहरातील विजया लॉन्स येथे सायंकाळी सहा वाजता मेळाव्यास सुरूवात झाली. यावेळी मेळाव्यात डॉ संभाजीराजे पाटील यांनी व त्यांचावर विश्वास ठेवत असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय पवार,अमित पाटील,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,अभिलाषा रोकडे,योगेश देसले,अरविंद मानकरी,सविता भोसले,माजी आमदार दिलीप वाघ,भूषण भदाणे,ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष रिटा बाविस्कर,डॉ महेश पवार, कुशल देशमुख,किशोर पाटील, प्रा सुरेश पाटील,एल टी पाटील, सुनील काटे आदी उपस्थित होते.
मंत्री अनिल पाटील यांनी, वैद्यकीय व्यवसाय बरोबर पक्षाच्या माध्यमातून डॉ.संभाजी पाटील यांनी मतदार संघात गरजूंची कामे करावी.कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा पाईक असून येणाऱ्या काळात समन्वय समिती स्थापन करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करावे,कार्यकर्त्यांनी ही डॉ संभाजीराजे पाटील यांच्या पाठीशी मजबूतीने उभे रहावे असे आवाहान केले.तसेच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डॉ संभाजीराजे पाटील हा नवा चेहरा मतदारांसमोर दिला असून मतदारसंघाची विकास कामे करण्याची संधी त्यांना द्यावी, लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पक्षाला तिकीट मिळावे अशी आग्रही भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.