शरद पवारांचे फोटो, नाव वापरु नका. -सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आदेश

0

24 प्राईम न्यूज 15 Mar 2024. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने शरद पवार यांचे नाव आणि छायाचित्रे वापरल्याबद्दल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना चांगलेच फटकारले. सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला शरद पवार यांचे नाव, फोटो वापरणार नाही, असे स्पष्ट आणि बिनशर्त हमीपत्र देण्याचे निर्देश गुरुवारी दिले.

त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या गटाने आता शरद पवार यांचे नाव व छायाचित्र वापरणे थांबवले असून आता ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नावआणि छायाचित्र वापरत आहेत. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने शरद पवार यांचे नाव आणि द छायाचित्र वापरल्याबद्दल शरद पवार यांनी ॥ सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. गुरुवारी न्यायालयाने अजित पवार यांना या प्रकरणी उत्तर देण्यास सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!