निवडणुकीचे बिगुल वाजले. देशात ७ टप्प्यांमध्ये मतदान 4 जूनला मत मोजणी.

24 प्राईम न्यूज 17 Mar 2024. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्च्त्या मानल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण देशाला उत्कंठा लागून राहिलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा शनिवारी १६ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. देशात एकूण ७ टप्प्यांत निवडणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. १९ एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार असून २६ पी एप्रिल रोजी दुसरा, ७ मे रोजी तिसरा, १३ मे रोजी चौथा, २० मे रोजी पाचवा, २५ मे रोजी सहावा आणि १ जून रोजी सातव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. एकूणच एप्रिलच्या तिसऱ्या ब्ले आठवड्यापासून जून महिन्याच्च्या पहिल्या आठवड्यापर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल. या दिवशी सर्व टप्प्यांची एकाच वेळी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचाफैसला ४ जून रोजीच होणार आहे. , निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात घ आचारसंहिताही लागू झाली आहे.