मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलोदेवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला.


24 प्राईम न्यूज 18 Mar 2024. काँग्रेस न होती तो क्या होता? या प्रियम गांधी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळीत करण्यात आले. यावेळी घेतलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना ‘मी पुन्हा येईन’ या वाक्यावरून त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मला पुन्हा यायला अडीच वर्षे लागली, पण आलो तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन पक्ष फोडून आलो आणि एकटा नाही तर आणखी दोघांना सोबत घेऊन आलो, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेस नसती, तर भारताची फाळणी झाली नसती, काँग्रेस नसती, तर देशात भ्रष्टाचार झाला नसता, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली
