‘घरांवरील धार्मिक झेंडे उतरवण्याची सक्ती नाही!’ -उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर.


अमळनेर /प्रतिनिधी. आचारसंहितेनिमित्त राजकीय झेंडे, पोस्टर अथवा बॅनर काढून घेतले जात आहेत. मात्र, धार्मिक झेंडे काढणे नागरिकांना सक्तीचे नाही. स्वेच्छेने काढू अथवा लावू शकतात, अशी माहिती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिलीलोकसभानिवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी महसूल, पंचायत समिती, पोलिस प्रशासन, नगरपालिकेसह सर्व विभागांची बैठक घेऊन आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक विभागाचे कर्मचारी शहरात तथा ग्रामीण भागात फिरून सार्वजनिक ठिकाणी असलेले राजकीय पक्षांचे पोस्टर्स, झेंडे, बॅनर्स, विकासकामांचे फलक काढून घेत आहेत. तसेच नागरिकांच्या घरावरीलझेंडे, चिन्हदेखील काढण्याच्या सूचना देत आहेत. मात्र, पालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना धार्मिक झेंडा काढण्याच्या सूचना देत असल्याने नागरिकांत संभ्र निर्माण झाला होता काहींनी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेतली असता घरावरील तसेच धार्मिक स्थळावरील धार्मिक झेंडे काढण्याची सक्ती नाही, असे खेडकर यांनी सांगितले दरम्यान, पथदिवे अथवा हायमास्ट लॅम्पवर त्यांच्या नावाचे फलक, पक्षाचे चिन्ह असल्याने ते झाकण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत होत आहे. शिड्या आणून खांबावर चढणे आणि त्याला कापड चिकटवणे यासाठी कर्मचारी काम करीत आहेत. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, सुशांत पाटील,पोलिस निरीक्षक विकास देवरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत
