लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ; गुन्हा दाखल..

पारोळा प्रतिनिधी /प्रकाश पाटील

पारोळा – लग्नाचे आमिष दाखवत एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस वेळोवेळी शारीरिक संबंध केल्याप्रकरणी तरुणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यातील नाना बारकू सोनवणे या तरुणाने एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. त्यानंतर अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावत तसेच विश्वास संपादन करत तिच्यावर वेळोवेळी शारीरिक सबंध केले.एक दिवस तरुणीचे अचानक पोट दुखू लागल्याने सदर प्रकार हा उघडकीस आला.याप्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसांत संशयीत आरोपी नाना सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
