शरद पवार यांचा पराभव हेच ध्येय-चंद्रकांत पाटील.

24 प्राईम न्यूज 19 Mar 2024

शरद पवार यांचा पराभव करणे हेच एकमेव ध्येय असल्याचे विधान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले. ते म्हणाले की, बारामती लोकसभेत मला आणि भाजप कार्यकर्त्यांना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. तसेच शरद पवार यांचा पराभव करणे, आमचे एवढे एकच ध्येय आहे. आम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हाला आम्ही पाठिंबा देणार आहोत. त्यामुळे लोक आमच्यावर टीका करतात, पण राजकारणात तराजू लावून निर्णय घ्यावे लागतात. सध्या आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा वाटतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
