पोटात होते ते ओठावर आले-सुप्रिया सुळे

24 प्राईम न्यूज 19 Mar 2024

अनेक वर्षांपासून जे पोटात होते ते आता ओठावर आले, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले. सुळे म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षापासून भाजपचा हाच अजेंडा आहे. जो आजपर्यंत स्पष्ट करत नव्हते तो आता पोटातला ओठावर आला. तो चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून त्यांनी ओठावर आणलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार यांना हरवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत, त्यात त्यांना यश येत नव्हते, हे त्यांनीच स्पष्टपणे कबूल केले आहे. भाजपची ही राजनीती अतिशय गलिच्छ आणि घाणेरडी आहे, अशी टीका सुळे यांनी केली.
