गुजरात विद्यापीठ मारहाण प्रकरण ५ हल्लेखोरांना अटक.

0


24 प्राईम न्यूज 19 Mar 2024

अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहातील खोलीत नमाज पढत असताना काही परदेशी विद्यार्थ्यांना शनिवारी रात्री उशिरा मारहाण झाली होती. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी दंगल, तोडफोड आणि गर्दी जमवण्याच्या आरोपाखाली २४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत ५ हल्लेखोरांना अटक केली आहे. मारहाण झालेल्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये अफगाण, आफ्रिका आणि मध्य आशियातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना नवीन वसतिगृहात हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर दोन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील एक विद्यार्थी श्रीलंकेचा तर दुसरा ताजिकिस्तानचा असल्याचे समजते. याशिवाय परदेशी विद्यार्थी सल्लागार समितीही स्थापन करण्यात आली आहे. वसतिगृहाची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे निर्देशही विद्यापीठाने सुरक्षा यंत्रणांना दिले आहेत. परदेशी विद्यार्थी रात्री नमाज अदा करताना गमछे घालून जय श्रीरामच्या घोषणा देत आलेल्या जमावाने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. वसतिगृहात दगडफेक आणि तोडफोडही केली. या हल्ल्यात सहभागी इतर आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अहमदाबादचे पोलीस उपायुक्त तरुण दुग्गल यांनी सांगितले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!