मुलीचा लग्नासाठी जमलेली सहा लाखांची रक्कम अज्ञातांनी केली लंपास.

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील

पारोळा – येथील राजीव गांधी नगरात घरातून अज्ञात चोरट्यांनी सहा लाखांची रोकड लंपास केल्याची घटना दि १७ रोजी मध्यरात्रीचा सुमारास घडली.
राजीव गांधी नगरात नंदू रमण मिस्त्री हे राहत असुन ते मिस्त्री काम करून परिवाराच्या उदरनिर्वाह करतात.दि १७ रोजी रात्री दहा वाजता कुटुंबासोबत जेवण करून झोपी गेले,त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा पत्नी सकाळी उठल्या असता त्यांना घराचा पाठीमागील दरवाजा उघडा दिसला.त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील लोखंडी कोठी दिसून आली नाही. या कोठीत त्यांनी कुलूप लावून मुलीच्या लग्नासाठी जमा केलेली सहा लाखांची रोकड ठेवली होती. त्यांनी कोठीची शोधशोध केल्यावर ती घराच्या मागील बाजूस उघड्या जागेत पडलेली मिळून आली.दरम्यान मुलीच्या लग्नासाठी जमा केलेली सहा लाखांची रोकड अज्ञातांनी चोरून नेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होत आहे,पोलीसांनी गस्त वाढ करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे
