राज ठाकरे यांनी दिल्लीसमोर झुकणे जनतेला न आवडणारे. -आमदार रोहित पवार

24 प्राईम न्यूज 20 Mar 2024

राज ठाकरे यांनी मागील निवडणुकीत भाजपविरोधात सामान्यांच्या बाजूने भाषणे केली. बेरोजगारीचा प्रश्न उचलून धरला. ते जर भाजपबरोबर जात असतील आणि दिल्लीसमोर झुकत असतील तर ते राज्यातील जनतेलाही आवडणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.
रोहित पवार हे मंगळवारी आदिवासी बांधवांच्या होळी उत्सवातील भोंगऱ्या बाजार अनुभवण्यासाठी चोपडा तालुक्यातील मालापूर येथे आले होते. त्यांनी चोपडा येथील ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
