‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’, राजकारणी ते जन्मठेप. -चकमकफेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेप.

0

24 प्राईम न्यूज 20 Mar 2024. चकमकफेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या बनावट चकमकीप्रकरणी त्यांना ही शिक्षा देण्यात आली आहे येत्या तीन आठवड्यांत जेलमध्ये हजर होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत गेल्या काही वर्षांपासून शर्मा हे राजकारणात सक्रिय होऊ पाहात होते. पण कोर्टानं त्यांना चांगलाच दणका दिला
‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’, राजकारणी ते जन्मठेप असा आहे प्रवास
प्रदीप शर्मा चकमकफेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या बनावट चकमकीप्रकरणी त्यांना ही शिक्षा देण्यात आली आहे येत्या तीन आठवड्यांत जेलमध्ये हजर होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत गेल्या काही वर्षांपासून शर्मा हे राजकारणात सक्रिय होऊ पाहात होते. पण कोर्टानं त्यांना चांगलाच दणका दिला आहे.
कोण आहेत प्रदीप शर्मा
निवृत्ती घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. पालघरमध्ये नालासोपाऱ्यात शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती.

शर्मा कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील आग्र्याचे. मात्र, प्रदीप शर्माचे वडील महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात स्थलांतरित झाले. तिथेच ते स्थायिकही झाले. ते पेशानं शिक्षक होते.
प्रदीप शर्मा यांचा जन्म जरी उत्तर प्रदेशातील असला, तरी ते लहानपणापासूनच महाराष्ट्रात राहिले आहेत. लहानपणीच वडिलांसोबत ते धुळ्यात राहिले आणि प्राथमिक शिक्षणापासून ते एमएस्सीपर्यंत ते धुळ्यातच वाढले. शिक्षण घेतल्यानंतर एमपीएससी करून ते पोलीस सेवेत दाखल झाले.

पोलीस सेवेच्या आकर्षणाबद्दल सांगताना ते म्हणतात, “धुळ्यात असताना आमच्या शेजारी पगार नावाचे इन्स्पेक्टर राहायचे. लहान असताना त्यांना पाहायचो. ते युनिफॉर्मवर बाईकवर जात असत. पोलीस सेवेच्या आकर्षणासाठी ते एक कारणीभूत ठरलं म्हणता येईल.”

महाराष्ट्रातली 1983 ची पोलिसांची बॅच सर्वांत प्रसिद्ध ठरली. या बॅचमध्ये प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, रविंद्र आंग्रे, अस्लम मोमीन असे ‘एनकाउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून सर्वत्र परिचित असलेले पोलीस अधिकारी होते. याच बॅचमध्येच प्रदीप शर्मा हे सुद्धा आहेत.

नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर ही बॅच 1984 साली पोलीस सेवेत कार्यरत झाली. प्रदीप शर्मा यांची पहिली नियुक्ती मुंबईतल्या माहिम पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदावर झाली. त्यानंतर ते स्पेशल ब्रँचमध्ये गेले. नंतर मुंबई उपनगरातील पोलीस ठाण्यांचे प्रमुख, क्राईम इंटेलिजियन्समध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!