धुळ्यात पहिली यशस्वी ऑर्बिटल ॲथेरेक्टॉमी अँजिओप्लस्टी.

24 प्राईम न्यूज 21 Mar 202

धुळे -खान्देशातील प्रथम गोल्ड मेडलिस्ट हृदयरोगतज्ज्ञ डॉ. तुषार अर्जुन पाटील मुळचे अमळनेर येथील धुळ्याच्या सर्वज्ञ कार्डिओ केअर सेंटरमध्ये धुळे जिल्ह्यातील पहिली ऑर्बिटल ॲथेरेक्टॉमी अँजिओप्लस्टी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
चोपडा येथील ७० वर्षीय रुग्णावर कमकुवत हृदयावरील अत्यंत जोखमीची आणि गुंतागुंतीची ऑर्बिटल ॲथेरेक्टॉमी अँजिओप्लस्टी धुळे येथील सर्वज्ञ कार्डिओ केअर सेंटरमध्ये यशस्वीरित्या पार पडून रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले. सुरुवातीला रुग्णाच्या हृदयाचे पंपिंग खूप कमी होत होते, त्यामुळे बायपास शक्य नव्हते. ऑर्बिटल ॲथेरेक्टॉमी शस्त्रक्रियेत, हृदयातील रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियमचे ब्लॉकेज मशीनच्या सहाय्याने फोडून रक्तवाहिन्या पूर्ववत केल्या जातात.
डॉ. तुषार अर्जुन पाटील हे सर्वज्ञ कार्डिओ केअर सेंटरचे संचालक असून केरळ विद्यापीठातून गोल्ड मेडल मिळवणारे ते धुळे जिल्ह्यातील पहिलेच डॉक्टर आहेत. गुंतागुंतीच्या आणि जोखमीच्या अँजिओप्लेस्टीमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे.या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे धुळे आणि आसपासच्या परिसरातील हृदयरोगी रुग्णांना मोठा दिलासा मिळेल.
या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे धुळे जिल्ह्यातील रुग्णांना आता अत्यंत प्रगत हृदयरोग उपचारांसाठी मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
डॉ. तुषार पाटील आणि त्यांच्या टीमचे हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे
