सावखेडा येथे गावठी दारु अड्डयावर पोलिसांची धाड…

अमळनेर/प्रतिनिध

तालुक्यातील सावखेडा येथील गावठी दारु अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली असून 50 लिटर गावठी दारु नष्ट केली आहे. सावखेडा येथील दोघांवर अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तालुक्यातील सावखेडा येथे अवैध गावठी दारु विक्रीची माहिती पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना मिळाल्याने त्यांनी पोहेकॉ सुनील जाधव, विजय भोई, पोकॉ राहुल पाटील व योगेश बागुल यांचे पथक पाठविले असता संशयित दीपक संतोष वैदू हा एका टपरीच्या आडोश्याला दारु विक्री करतांना आढळून आला त्याच्याकडून 2 हजार रुपये किंमतीची 20 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली तर दुसऱ्या घटनेत सोमा बाबू वैदू याच्याकडून 3 हजार रुपये किंमतीची 30 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. नमुने घेवून दोन्हीकडील मुद्देमाल नष्ट करण्यात आला. दोघांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहे
