अमळनेर तालुका भडगाव आरटीओ कार्यलयाला जोडण्याचा घाट. -नागरिकांचा विरोध,महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनीही घेतला आक्षेप. -प्रांताधिकारीना निवेदन,जळगावच राहू देण्याची मागणी.


अमळनेर/प्रतिनिधी. जळगाव जिल्ह्यात भडगाव येथे नव्यानेच मंजुर झालेल्या आरटीओ कार्यालयाला अमळनेर तालुका जोडण्याचा घाट रचला गेला असून यास नागरिकांचा जोरदार विरोध होत असताना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आक्षेप घेत अमळनेर प्रांताधिकारीना निवेदन देत अमळनेर तालुका पूर्वीप्रमाणे जळगाव कार्यालयालाच जोडला राहू देण्याची मागणी केली आहे.
यात म्हटले आहे की अमळनेर तालुका हा पुर्वीपासूनच जळगांव आर.टी.ओ. कार्यालयास जोडलेला आहे,महाराष्ट्र शासनाने जिल्ह्यात भडगावं येथे नविन विभागीय आरटीओ कार्यालय निर्माण केल्याने अमळनेर हे भडगावं आर.टी.ओ कार्यालयास जोडण्यात आलेले आहे.परंतु यामुळे अमळनेर तालुक्यातील नागरीकांची गैरसोय होणार आहे. कारण भडगांव येथे जाण्या-येण्यासाठी पाहिजे तशी सुविधा नाही. तसेच जळगांव हे जिल्हयाचे ठीकाण असून सर्वसामान्य लोकांची इतर कामे जसे की जिल्हाधिकारी कार्यालय,पोलीस अधीक्षक कार्यालय व इतर महत्त्वाचे ऑफिसची कामे देखील एकाच दिवशी एकाच ठिकाणी करु शकतात. तसेच येजा करण्यासाठी रेल्वे, बस व इतर सुविधा मुबलक असल्याने जळगांव हे गैर सोईचे होत नाही.मात्र आरटीओ भडगाव झाल्यास नवीन वाहन जळगांव येथील शोरूम मध्ये घ्यावे लागेल व त्याला पासिंगसाठी भडगांव येथे घेवून जावे लागेल. त्यानंतर नागरिकांना अमळनेर ला यावे लागेल ,यामुळे नागरीकांचे आर्थीक तसेच वेळेचे, व मानसिक शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागेल- म्हणुन यासाठी अमळनेर तालुका हा पुर्ववत जळगांव आर. टी. ओ. जोडण्यात याववा ,अन्यथा आम्हांला नाईलाजास्तव तिव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळु पाटील,शिवसेनेचे उपशहर प्रमुख अनंत रमेश निकम,कुणाल सुर्यवंशी,दुर्गेश सुभाष पवार,सचिननिंबा वाघ,महेश प्रकाश ढाकरे,किशोर नारायण पाटील,नाना शंकर पाटील,नारायण रावा पाटील,नरेंद्र हनुमंत पाटील,शकील नजीर मुजावर,कैलास भीका पाटील,शालीक प्रल्हाद साळुंखे,सुशील शांताराम सोनार,प्रकाश पंढरीनाथ पाटील,संभाजी नारायण पाटील,अमित रवींद्र जगताप,मदन मोहन पाटील,अनिल साहेबराव पाटील,कैलास विष्णू कांबळे,इम्रान खान हबीब पठाण,गोपाळ श्रीकृष्ण वानखेडे,धनराज भटूपाटील,किशोर हिलाल पाटील यांनी दिला आहे.