केजरीवाल यांना अटक. -नऊ समन्स धुडकावल्यानंतर ईडीची कारवाई.

24 प्राईम न्यूज 22 Mar 2024

दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित मनी लॉड्रिग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुयारी रात्री मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. ईडीने चौकशीसाठी बजावलेले सलग नऊ समन्स केजरीवाल यांनी धुडकावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अटकेपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या घरात घुसून त्यांची दोन तासांहून अधिक वेळ चौकशी केली. चौकशीपूर्वी केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या परिसरात शीघ्र कृती दल (आरएएफ) आणि केंद्रीय राखीच पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडया तैनात करण्यात आल्या. तत्पूर्वी, गुरुवारी दुपारी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना सक्तीच्या कारवाईपासून कोणतेही संरक्षण देण्यास नकार दिला होता, त्यावर केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन तातडीच्या सुनावणीची मागणी केली आहे
