मनसेच्या खांद्यावर आता खेळणार कोणाची मुलं… -अखेर राज ठाकरे यांची भाजपशी सलगी..


24 प्राईम न्यूज 22 Mar 2024.. ‘एकला चलो रे’ची हाक देत नेहमीच स्वबळाचे तुणतुणे वाजविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची कास पकडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गेल्या महिन्यात नाशिक दौऱ्यावर पुत्रासह आलेल्या राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगत चुप्पी साधली होती. यावेळी त्यांनी मी दुसऱ्यांची पोरं खांद्यावर खेळविणार नसल्याचे सांगत अप्रत्यक्ष भाजपावर टीकाही केली होती.
राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे अवघ्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. मुंबईत गेल्यानंतर राज यांनी भाजपशी जरा जवळीक साधत थेट दिल्ली गाठली. त्यांनी राजधानी दिल्लीची वारी करत भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्यासह नेत्यांची भेट घेतल्याने चर्चेचा धुराळा उडाला • आहे. महायुतीमध्ये आता चौथा भिडू मनसेच्या रूपाने आला आहे. जागावाटपाच्या मुद्यावर शिवसेना, राष्ट्रवादीला आपल्याच इशाऱ्यानुसार • चालण्यासाठी भाजपकडून मजबूर • केले जात असल्याची खरपूस चर्चा आहे. आता मनसेनेही च महायुतीची कास पकडल्याने भाजपवाले मनसेला काय देणार या मुद्द्याभोवती चर्चेचे – सूर फिरताहेत. नाशिकच्या जागेवरूनअगोदरच शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपात विळा-भोपळ्याची स्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत भाजप नाशिकबाबत मनसेचा विचार करेल, असा विचार करणे म्हणजेच विनोद ठरेल.
मनसेची नाशिक, पुणे, मुंबईसह राज्यातील काही ग्रामीण भागातही चांगली ताकद आहे. ही ताकद गेल्या काही वर्षांपासून मतात परिवर्तित होत नाही तो भाग वेगळा. परंतु राज ठाकरेंची किमया अजूनही आहे. ही बाब चाणाक्ष भाजपवाल्यांनी बरोबर हेरले अन राज यांना गळाला लावले. राज ठाकरे धोरणी अन पक्के राजकारणी असल्याने त्यांनी राजकारणाच्या हवेची दिशा बघून भाजपशी बरोबर सलगी करून घेत महायुतीची कास धरली
