पंतप्रधानांना औरंगजेबाची उपमा देणे हा देशद्रोह. -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


24 प्राईम न्यूज 22 Mar 2024. ज्यांनी दहशतवादी याकूब मेमनची कबर सजविली, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्यांची साथ धरली. त्यांनी राष्ट्रभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेबाची उपमा देणे हा देशद्रोह असल्याचे टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सोडले. याचे उत्तर महाराष्ट्रातील जनताच येत्या निवडणुकीत मतपेटीतून देणार असल्याचे ते म्हणाले.
महायुतीच्या जागावाटपाची चर्चा योग्यरीतीने सुरू आहे. महाराष्ट्रातून ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्याचीच व्यूहरचना पक्षाच्या बैठकीत ठरविण्यात आल्याचेही ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना औरंगजेबाची उपमा दिली आहे.
त्यावर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, खरे तर त्यांचीच वृत्ती औरंगजेबाची आहे. भावाला, बापाला न सोडणाऱ्या औरंगजेबाची वृत्ती त्यांनी दाखवली आहे. अशांनी देशभक्त आणि राष्ट्रभक्त पंतप्रधान मोदींना औरंगजेबाची उपमा देणे हा देशद्रोह आहे. ज्यांनी राममंदिर बांधले, ३७० कलम हटविले अशा पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणे हा अपमान आहे. महाराष्ट्रातील जनता या अवमानाचे उत्तर मतपेटीतूनच देईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले
