नको आम्हाला आरटीओ भडगाव,,, हवं आम्हाला आरटीओ जळगाव. -मी अमळनेर फक्त एम एच 19,अमळनेरात राबविली सह्यांची मोहीम.

अमळनेर/प्रतिनिधी

अमळनेर-“नको आम्हाला आरटीओ भडगाव”,,, “हवं आम्हाला आरटीओ जळगाव” मी अमळनेर फक्त एम एच 19 असा नारा देत अमळनेरात सह्यांची मोहीम राबविण्यात आली.
अमळनेर सुजाण नागरिकांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली.जळगाव जिल्ह्यात नव्यानेच निर्माण झालेल्या भडगाव आरटीओ कार्यालयास अमळनेर तालुका जोडण्याचा निर्णय झाल्याने त्या विरोधात ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.सदर मोहिमेसाठी जि प विश्रामगृह जवळील महाराणा प्रताप चौकात भव्य डिजिटल फलक लावण्यात आला होता,सदर मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी माजी आमदार डॉ बी एस पाटील यांच्या हस्ते स्वाक्षरी करून शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी जेष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील,राष्ट्रवादी शहराध्यक्ष श्याम पाटील,शहराध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे,सेनेचे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील,सचिन वाघ,मयूर पाटील,मनोज शिंगाने,सनी गायकवाड,महेश पाटील, सनी पाटील यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.दिवसभरात शेकडो नागरिक व वाहनधारकांनी याठिकाणी स्वाक्षऱ्या करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.कोणत्याही परिस्थितीत आम्हाला भडगाव कार्यालय नको असून जळगाव कार्यालयालाच अमळनेर पूर्ववत जोडावे अशी मागणी अनेकांनी यावेळी साऱ्यांनी व्यक्त केली
