केजरीवाल ६ दिवस ईडीच्या कोठडीत. -दिल्ली मद्य धोरणात केजरीवालच मास्टरमाईंड असल्याचा ईडीचा दावा.

24 प्राईम न्यूज 23 Mar 2024

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी रात्री आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २ तासांच्या चौकशीनंतर अटक केली. यानंतर केजरीवाल यांना शुक्रवारी दुपारी राऊस अॅव्हेन्यू न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी अरविंद केजरीवाल हेच दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. या धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांचा थेट सहभाग असल्याचा युक्तिवाद ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी केला. यावेळी ईडीकडून केजरीवाल यांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली, तर अरविंद केजरीवाल यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. कोणताही ठोस पुरावा नसताना केजरीवाल यांना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद सिंघवी यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने केजरीवाल यांना १० दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे
