केजरीवाल त्यांच्या कृत्यामुळेच अटकेत – अण्णा हजारें

24 प्राईम न्यूज 23 Mar 2024

राळेगणसिद्धी । दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मी केजरीवाल यांना नवीन मद्य धोरणाबाबत दोनदा पत्रे लिहिली होती. त्यांनी माझे ऐकले नाही. एकेकाळी माझ्यासोबत काम करणारे, दारूविरोधात आवाज उठवणारे अरविंद केजरीवाल आता दारू धोरण बनवत आहेत हे ऐकून दुःख झाले. त्यांना स्वतःच्या कृत्यामुळे अटक झाली आहे. आता मी त्यांना कोणताही सल्ला देणार नाही. कायदा आणि सरकारला जे काही करायचे आहे ते करावे, अशी प्रतिक्रिया शुक्रवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर राळेगणसिद्धी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. आंदोलनावेळी केजरीवाल आणि मनीष सिसोदिया आमच्यात सामील झाले होते, तेव्हा मी त्यांना नेहमी देशाच्या हितासाठी काम करण्यास सांगितले होते, पण त्यांनी ते लक्षात ठेवले नाही, ते त्यांच्या मार्गाने पुढे गेलेअसेही अण्णा हजारे म्हणाले.
