केजरीवालांना अटक भाजपसाठी बुमरँग-शरद पवार.

24 प्राईम न्यूज 23 Mar 2024

केंद्रातील मोदी सरकारने देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयला लावले आहे. आता थेट वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्याचे सत्र सुरू केले आहे. आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबले. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्यावरून अटक केली आहे. ही कारवाई पूर्णपणे निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून केली आहे. भाजप सत्तेसाठी किती खोलवर झुकणार हे या अटकेवरून दिसून येते. अरविंद केजरीवालांना केलेली ही अटक भाजपसाठी बुमरँग ठरेल. याचा लोकसभा निवडणुकीत भाजपलाच १०० टक्के फटका बसेल. या घटनाबाह्य कारवाईविरोधात ‘इंडिया’ एकजुटीने केजरीवालांच्या पाठीशी उभी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
