राऊतांनी पाठीत खंजीर खुपसला. प्रकाश आंबेडकरांचा आरोप.


24 प्राईम न्यूज 29 Mar 2024. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या माध्यमातून म्हटले, संजय, किती खोटे बोलाल ? जर तुमचे आणि आमचे विचार एक आहेत, तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलवले नाही ? ६ मार्चला फोर सिझन हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर आमच्या कुणा प्रतिनिधीला का निमंत्रित केले नाही? तुम्ही वंचितला निमंत्रित न करता बैठक का घेत आहात? असे सवाल आंबेडकर यांनी राऊत यांना उद्देशून केले. तुम्ही सहकारी असूनही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती, हे आम्हाला ठाऊक आहे. अकोल्यात माझ्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रस्ताव तुम्ही ठेवला होता हे खरे नाही काय? एका बाजूला आघाडीचा भास निर्माण करत आहात आणि दुसरीकडे आम्हाला पराभूत करण्यासाठी कारस्थान रचले जात आहे, असे आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेआहे.
