उत्तर प्रदेशातील गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू.


24 प्राईम न्यूज 29 Mar 2024. उत्तर प्रदेशातील बांदा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला मुख्तार अन्सारी याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तो ६३ वर्षांचा होता. गुरुवारी सायंकाळी त्यांना तुरुंगातून राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. कारागृह प्रशासनाने अद्याप कोणतेही निवेदन दिलेले नाही. गेल्याच आठवड्यात त्याला आयसीयूतून बाहेर काढून त्याची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली होती त्याचबरोबर मऊ आणि गाझीपूरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. येथे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याशिवाय बांदा येथेही विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डीजीपीमुख्यालयानेही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यापूर्वी मंगळवारी मुख्तार याची प्रकृती खालावली होती. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. काही दिवसांपूर्वीच मुख्तार अन्सारींनी आपल्याला स्लो पॉयझन देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला होता.
मुख्तार अन्सारींच्या वकिलाचे म्हणणे आहे की, त्यांच्याबद्दल काही वेळाने माहिती मिळेल. मुख्तार यांचे पुतणे आणि आमदार सुहैब अन्सारी यांनी सांगितले की, त्यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही बांद्याला निघालो आहोत.
मुख्तार अन्सारी २००५ पासून शिक्षा भोगत आहेत. वेगवेगळ्या खटल्यांमध्ये त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
