लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘स्टार प्रचारक’ यादीत मंत्री अनिल पाटील यांचा समावेश.

24 प्राईम न्यूज 29 Mar 2024

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाने ३७ जणांची ‘स्टार प्रचारक’ यादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस एस.आर. कोहली यांनी जाहीर केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असून राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. खासदार सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, माजी सभापती रामराजे निंबाळकर, मंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे, अदिती तटकरे, अनिल पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, सुबोध मोहिते, बाबा सिद्दीकी, रुपाली चाकणकर, उमेश पाटील आदींचा समावेश आहे.
