भाजपविरोधात तिसरी आघाडी ?अॅड. प्रकाश आंबेडकरांनी सस्पेन्स वाढवला.


24 प्राईम न्यूज 30 Mar 2024. लोकसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा देणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीसोबतची चर्चा अद्याप बंद केलेली नसल्याचे स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या बैठका आजही सुरू आहेत. त्यामुळे आम्ही बैठक घेतली तर त्यांनीही बैठकीला यावे, अशी भूमिका मांडत आंबेडकर यांनी आघाडीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. तसेच भाजपविरोधात आम्ही मजबूत आघाडी उघडणार आहोत. यासंदर्भात विविध संघटनांशी बोलून येत्या २ एप्रिलपर्यंत चित्र स्पष्ट करू, असा विश्वासही आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला.
