दोंडाईचा शहरात पोलिसांकडून वाहन तपासणी कारवाई.

दोंडाईचा प्रतिनिधी रईस शेख
दोंडाईचा शहर व परिसरात गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शहर पोलीस ठाण्याच्यावतीने सलग २ दिवस नाकाबंदी आणि वाहन तपासणी करून नियमबाह्य पद्धतीने दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई आणि २० चार चाकी वाहनांची तपासणी व कारवाई करण्यात आली आहे

सायंकाळी दोंडाईचा बस स्टेशन तसेच चौफुली रत्स्यावरील येथे व दि. ३० रोजी सायंकाळी दोंडाईचा – नंदुरबार मार्गावरील नंदुरबार चौफुली येथे नाकाबंदी करून दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरामध्ये अनेकदा तीन किंवा त्यापेक्षा जास्त लोक दुचाकीवर बसून बेकायदेशीर व धोकादायक स्थितीत प्रवास करत असल्याचे, अनेक दुचाकींना नंबर प्लेट नसल्याचे अथवा ती व्यवस्थित दिसत नसल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. –
दोंडाईचा शहरातील गुन्ह्यांचा आढावा घेता, अनेक गुन्ह्यांमध्ये वाहनांचा वापर झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच असल्याचे ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची
तपासणी करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच जीवितहानीच्या घटना टाळण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने दुचाकी चालविणाऱ्यांविरुद्ध सदर नाका बंदी करण्यात आली होती. पुढील काळातही शहरातील कुठल्याही भागांमध्ये आकस्मिकपणे या पद्धतीची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगत वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, विनापरवाना वाहन चालवू नये, वाहनांची नंबर प्लेट नियमानुसार असावी, ती सुस्पष्ट दिसावी, त्याचबरोबर वाहनांच्या कागदपत्रांची खात्री करावी व वाहतूक नियमांचे पालन करावे असे सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे सो, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रभारी स.पो. नि. निलेश मोरे, पोउपनि / चांगदेव हंडाळ, पोउपनि हेमंत राऊत, पोउपनि / नकुल कुमावत, पोहेकॉ सुनिल महाजन, प्रशांत कुलकर्णी, पो.ना. नरेंद्र शिरसाठ, नरेश मंगळे, पोकों/ हिरालाल सुर्यवंशी, निर्मल वंजारी, प्रकाश पावरा तसेच दोंडाईचा पोलीस स्टेशनचे होमगार्ड अशांनी केली असुन नागरीकांनी वाहतुक नियमांचे पालन करुन वाहने चालविणे बाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश मोरे यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.
