बारामतीतून नणंद V/s भावजय -सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर.

24 प्राईम न्यूज 31 Mar 2024

। राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) शनिवारी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे आता बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार अर्थात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आपले बंड मागे घेतल्यावरआणि शरदचंद्र पवार गटाने ५ – उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर – अजित पवार गटाकडून तातडीने – पत्रकार परिषद् घेण्यात ओली. यावेळी – सुनील तटकरे यांनी बारामतीमधून – सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर – कॅली. विजय शिवतारे यांना अजित – पवार यांच्याविषयी काय वाटते हा – त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण – विजय शिवतारे यांनी महायुतीच्या – उमेदवाराला समर्थन देण्याचा निर्णय – घेतला आहे. बारामती लोकसभा – मतदारसंघातून सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यामुळे विजय शिवतारे यांचे सुनेत्रा पवार याना समर्थन आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे बाकीच्या गोष्टी आमच्यासाठी गौण – आहेत, असे सुनील तटकरे यांनी – यावेळी स्पष्ट केलें
