निवडणुकीत उमेदवार देणार नाही-मनोज जरांगे..

24 प्राईम न्यूज 31 Mar 2024

लोकसभा निवडणुकीत आपण कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही आणि अपक्ष उमेदवारही उभा करणार नाही. ज्यांना ज्या उमेदवारांना पाडायचे असेल त्यांनी त्या उमेदवाराला पाडावे, असा खुलासा मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी केला. जरांगे-पाटील यांच्या या भूमिकेमुळे जरांगेंना सोबत घेऊ पाहणाऱ्या वचित बहुजन आघाडीची कोंडी होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे- पाटील यांनी प्रत्येक जिल्ह्यात अपक्ष उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांकडून अहवाल मागविला होता. यो पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभा करणार नाही, अशी घोषणा केली
