सेहेर’ साठी रोजा पाळणाऱ्या लोकांना उठवण्याची परंपरा शहरात अनेक वर्षांपासून..

दोंडाईचा प्रतिनिधी रईस शेख
मुस्लिम बांधवांच्या रमजानच्या पवित्र महिन्यात सेहरीच्या वेळी रोजे करणाऱ्यांना उठवण्याच्या पद्धती काळानुरूप बदलल्या मात्र दोंडाईचा शहरात आजही पारंपरिक पद्धती पाळल्या जातात. दोंडाईचा मध्ये, रमजानच्या पवित्र महिन्यात, दोन्ही मुस्लिम भाऊ रात्रभर जागृत राहतात आणि रोजेदार बांधवांना सहेरी साठी उठवतात. गेल्या २० ते २५ वर्षांपासून ते रमजानच्या काळात हे काम करत आहेत. हा इसम निस्वार्थपणे समाजाची सेवा करत आहे. त्याची परंपरा आजही थांबलेली नाही. शरीफ शाह व जुम्मा शाह या दोन्ही मुस्लिम भाऊ ने रात्री दोन वाजता बाहेर पडतात आणि अनेक घरात जाऊन उपवास करणाऱ्यांना उठवतात शरीफ शाह हे शहरातील वस्तीत जाऊन रात्री २ वाजे पासून उपवास करणाऱ्यांना उठवण्याची परंपरा पाळत आहे
दोंडाईचा शहरातील शरीफ शाह (वय-४८) हे गेल्या २० वर्षांपासून उपवास करणाऱ्यांना पहाटे ३ वाजता उठवतात शरीफ शहा हे काम शहरात करतात .गेल्या २० वर्षांपासून सारऱ्या शाहची परंपरा पाळत आहेत. शरीफ शहा (उर्फ सारऱ्या) त्यांच्यासोबत निःस्वार्थपणे शहरात फिरत असत. जुम्मा शहा रात्री २ वाजता उठून मुस्लिम बांधवांना जागे करायचे, रात्र डोक्यावर घेऊन शहराच्या विविध भागात फिरतत शहराच्या विविध भागात ते दोन्ही भाऊ फिरतात आणि उपवासासाठी लोकांना जागवतो. त्यांच्या सोबत एक लांब काडी आणि बॅटरी घेऊन जातो. उपवास करणाऱ्यांना उठवण्याचे काम करतो. त्यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
शरीफ शाह म्हणाले की, आम्ही स्वच्छेने काम करतो, मी वीस वर्षांपासून स्वेच्छेने सेवा करत आहे. जेव्हाही मी वस्तीत येतो तेव्हा मी लोकांना त्यांचे नाव घेऊन जागे करतो. मी समाजसेवेच्या कामातून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा करता नाही. मी अन्नधान्य, पैसे किंवा कपडे स्व इच्छेने दिले तर स्वीकारतो.
- शरीफ शहा. रहिवासी दोंडाईचा,