काँग्रेसची आरक्षण गॅरंटी. -भाजपच्या एक पाऊल पुढे टाकत लोकसभेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध.


24 प्राईम न्यूज 6 Apr 2024 . काँग्रेसने सत्ताधाऱ्यांच्या एक पाऊल पुढे टाकत लोकसभा निवडणुकीसाठी ग्यान संकल्पनेवर जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहल गांधी याच्या उपस्थितीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात शुक्रवारी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्यात प्रामुख्याने सामाजिक-आर्थिक आणि जातनिहाय जनगणना, महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण, एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांनी वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यामध्ये (जी)- गरीब, (वाय) युवा (ए) अन्नदाता, (एन) नारी संकल्पनेनुसार जाहीरनाम्यात ५ न्याय आणि २५ गॅरंटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये युवा, रोजगार, मजूर, महिलांना १ लाखाची मदत, शिक्षण, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी यासह तरुणांना ४० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासनदेखील देण्यात आले आहे.
